Adventure Section : Underwater Adventure





साहसाची धुंदी
किर्र गर्द घनघोर असे हे जंगल घनदाट ।
कुठे निसरडे रस्ते आणि कुठे भयंकर घाट ।।
बर्फाचे थर ठायी ठायी कधी हिमची लाट ।
कधी उसळते सर्व बाजूनी धुके धुके ते दाट।।
सोसाट्याचे वादळ वारे कधी न सोडती पाठ।
हिम्मत धरुनी परी काढणे या सर्वातून वाट।।
पाठीवरती ओझे आणि उरात आनंद ।
गिर्यारोहण असे चालते होऊनिया धुंद ।।
या धुंदीच्या आनंदाचा छंद कसा गाव ।
हिमालयासम थोर असा हा हर्षाचा ठेवा , बर्फाचा ठेवा ।।